Satana Ganpati Visarjan
sakal
सटाणा - ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, फुले-गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’च्या जयघोषात सटाणा शहराने काल शुक्रवारी (ता. २५) लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. दरवर्षी सायंकाळी चारच्या सुमारास सुरू होणारी मुख्य विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल साडेआठ वाजता सुरू झाल्याने शहराच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात नवा अध्याय नोंदला गेला. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या मिरवणुकीमुळे शहरातील प्रमुख मार्ग भक्ती, उत्साह आणि जल्लोषाने भारावून गेले होते.