सटाणा- सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक जुन्या पारंपारिक पद्धतीने येत्या ३१ मार्चला होणार असून, १ एप्रिलला मतमोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व बागलाणचे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी आज येथे ही माहिती दिली.