Crime
sakal
सटाणा: शहरातील भाक्षी रोड परिसरातून मोबाईल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला सटाणा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या मोहिमेत १९ वर्षीय संशयिताकडून १ लाख ५७ हजार रुपये किमतीचे पाच महागडे मोबाईल आणि एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.