

Wedding Drama: Bride Refuses to Marry on the Altar in Satana Village
Sakal
सटाणा : बागलाण तालुक्यातील एका गावात मोठ्या उत्साहात सुरू असलेला विवाहसोहळा ऐन क्षणी नाट्यमय वळणावर पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली वरात आणि आनंदात रंगलेले लग्नाचे वातावरण अचानक तणावपूर्ण बनले, जेव्हा सजलेल्या नवरीने बोहल्यावरच लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर हा वाद थेट सटाणा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.