Nashik News : विनापरवाना मद्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

liqour smuggler

Nashik News : विनापरवाना मद्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात अवैधरीत्या दारू विकणारे व दारूची तस्करी करणारे तसे अवैध व्यवसाय करणारे सध्या सटाणा पोलिसांच्या (Police) रडारावर आहे. (Satana Police launched major action against illegal liquor smugglers confiscated goods worth Rs 3 lakh 48 thousand 960 nashik news)

सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध दारू विकणाऱ्या व दारूची तस्करी करणाऱ्यांना गजाआड करून तब्बल ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार एका चारचाकी वाहनातून अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सूत्रे हलवून नाकाबंदी केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शहरातील चौगाव रस्त्यावर समाधान किसन मोरकर (रा. कौतिकपाडे), अशोक दीपचंद चोपडा (रा.मित्रनगर, सटाणा) यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात १ लाख ४८ हजार ९६० रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू आढळून आली.

यावेळी पोलिसांनी दोघा आरोपींसह देशी विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक केली जात असलेले दोन लाख रुपये किमतीचे वाहनही ताब्यात घेतले. दोघा आरोपींवर सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई श्री. पवार, पोलिस नाईक अजय महाजन, अशोक चौरे, श्री.शेवाळे, श्री.शिंदे, श्री. मोरे यांनी केली.