सटाणा- नोकरीसाठी पुणे येथे गेलेल्या ठेंगोडा (ता.बागलाण) येथील आर्यन अशोक सावळे (वय २०) या युवकाचा कात्रज परिसरात एका पानटपरीवर किरकोळ कारणावरून कोयता गॅंगच्या गुंडांनी कोयत्याने वार करून खून केला. या घटनेने बागलाण तालुक्यात संतापाची लाट आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सटाणा शहर शिंपी समाज, नवयुवक मंडळ आणि शिंपी समाज महिला मंडळातर्फे बागलाण तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.