Satana Highway
sakal
सटाणा: शहरातून जाणाऱ्या साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग (जी ७५३) वरील काँक्रीटीकरणाच्या प्रलंबित कामामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत दाट धुळीचे साम्राज्य, वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान आणि सततच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे वाढते विकार या सर्वांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.