

School Education Minister Dadaji Bhuse during the meeting on the pending Satana–Mangrul National Highway project.
Sakal
सटाणा : शहरातून जाणाऱ्या साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाला आता प्रशासकीय पातळीवर निर्णायक गती देण्याचे संकेत मिळाले आहेत. वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील जलनिस्सारण, अतिक्रमणे आणि शहराच्या भविष्यातील वाढत्या गरजांचा विचार करून सटाणा–मंगरूळ महामार्गाच्या कामातील तांत्रिक व प्रशासकीय अडथळे तातडीने दूर करावेत, शहर वळण (बायपास) रस्त्यासह आवश्यक पायाभूत सुविधांचे दीर्घकालीन नियोजन करावे आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.