SBI ATM
sakal
सटाणा: शहरालगतच्या यशवंतनगर (औंदाणे शिवार) परिसरात चोरट्यांनी थरारक पद्धतीने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे संपूर्ण एटीएम मशिनच उचलून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १०) पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली. एटीएममध्ये सुमारे २५ लाख ९९ हजार ४०० रुपये रोकड असल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेमुळे सटाणा शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.