सप्तशृंगी गडावरील बॅरिकेटिंगमुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा व्यापारी व भाविकांची गैरसोय; रचनेत बदल करण्यासाठी प्रशासनाशी चर्चा

सप्तशृंगी गडावरील बॅरिकेटिंगमुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा व्यापारी व भाविकांची गैरसोय; रचनेत बदल करण्यासाठी प्रशासनाशी चर्चा
Published on: 
VNI26B13220 सप्तशृंगगड ः मंदिर पायरी मार्गावर करण्यात आलेले बॅरिकेटिंग. -------------------- ३६-३ पायरी मार्गावरील बॅरेकेटिंग रचना बदला ---------------- स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम ः भाविकांचीही गैरसोय --------------- दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१४ : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या बॅरिकेटिंगमुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील व्यापारी व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून बॅरिकेटिंगच्या रचनेत बदल करण्याची मागणी केली आहे. --------------- गडावरील मंदिर परिसर, पायऱ्या आणि बाजारपेठेतील मार्गांवर लावलेल्या लोखंडी अडथळ्यांमुळे भाविकांना दुकाने गाठणे अवघड झाले आहे. याचा फटका पूजा साहित्य विक्रेते, हार-फूलविक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि अन्य स्थानिक दुकानदारांना बसत आहे. नवरात्रोत्सवाच्या गर्दीच्या काळात व्यवसाय वाढण्याची अपेक्षा असताना, भाविकांची वर्दळ दुकानांपर्यंत पोहोचत नसल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. १६-१ वृद्ध, महिला, बालकांची गैरसोय बॅरिकेटिंगमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लांबचा वळसा घालावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. गर्दीच्या वेळी भाविकांची कोंडी होऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहावी, याकडेही लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. १६-१ समतोल साधण्याची मागणी या प्रश्नावर गावातील व्यापारी आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार तथा ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास वारुळे तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बॅरिकेटिंगमुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडून भाविकांची सुरक्षितता, सुलभ दर्शन आणि स्थानिकांच्या रोजगाराचा विचार करून पर्यायी व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. प्रशासनाने गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजना कायम ठेवताना व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून द्यावा तसेच भाविकांची ये-जा सुलभ होईल, अशा पद्धतीने बॅरिकेटिंगची पुनर्रचना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com