सतीश निकुंभ : सातपूर- सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची पावसामुळे अक्षरश: वाट लागली असून, हे रस्ते कामगार, उद्योजक, नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरू लागले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील उद्योजक, कामगार आणि वाहनचालकांचे या भागातून प्रवास करताना प्रचंड हाल सुरू आहेत. येथील समस्या सोडविण्यासाठी महापालिका सक्षम नसल्यास स्वतंत्र औद्योगिक प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी संतप्त उद्योजकांनी केली आहे.