नाशिक/सातपूर: सातपूर परिसरातील अशोकनगर येथे खासगी क्लासबाहेर दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर १६ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २) रात्री उशिरापर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. मृत्यूचे नेमके कारण विच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.