Gas Leak
sakal
नाशिक
Nashik News : सातपूर औद्योगिक वसाहतीत गॅस गळतीचा थरार; सीएट कंपनीसमोर फुटली गॅस पाइपलाइन
Gas Leak Sparks Panic in Satpur Industrial Area : सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर एमजीएनएलच्या पाइपलाइनमधून झालेली गॅस गळती; घटनेनंतर अग्निशमन दल आणि तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
सातपूर: औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर एमजीएनएलच्या गॅस पाइपलाइनमधून शुक्रवारी (ता.२०) दुपारी एकला अचानक गॅस गळती झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे २० ते २५ मिनिटे गॅसचे फवारे उडत असल्याने नागरिक व उद्योजकांमध्ये घबराट पसरली होती.
