
सातपूर परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न
सातपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नाशिक सह सातपूर मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मस्जिदी समोर हनुमान चालीसा पठण करण्याचां प्रयत्न करण्यात आला,परंतु पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटीही झाली पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान या सर्व संदर्भात सातपुरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी अधिक माहिती दिली की पहाटे च्या वेळी काही कार्यकर्ते सातपूर येथील प्रार्थना स्थळा समोर हनुमान चालीला पठण करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून तात्काळ कारवाई केली आहे.दरम्यान मनसेच्या या आंदोलनानंतर सातपूरची पहाटेची आजान ही बिना भोग्याने झाली असल्याच्या समोर येत आहे,
यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश लभडे, शहर उपाध्यक्ष सचिन सिंन्हा विजय अहिरे विशाल भावले मिलिंद कांबळे, अतुल पाटील
तर नगरसेवक योगेश शेवरे आणि सलीम शेख यांना पोलिसांकडून नजरकैदेत ठेवण्यात आला आहे
सलीम शेख यांना राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आला आहे
तर योगेश शेवरे यांना सातपूर पोलिस ठाण्यात पहाटे चार वाजेच्या सुमारास आणल असून नजरकैदेत ठेवण्यात आल आहे
Web Title: Satpur Hanuman Chalisa Played
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..