Misal Party
sakal
सातपूर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे. विविध पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्या राबविल्या जात असताना, यंदाच्या निवडणुकीत ‘मिसळ पार्टी’ हा प्रचाराचा प्रभावी फॉर्म्युला ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचबरोबर मतदार व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने बस, ट्रॅव्हल्स आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांची मागणी वाढली असून ट्रॅव्हल व हॉटेलिंगचा व्यवसाय चांगलाच तेजीत आला आहे.