सातपूर- औद्योगिक वसाहतीत रविवारी (ता. २०) सकाळी महिंद्र ॲन्ड महिंद्र सर्कलजवळ थरारक घटना घडली. पहाटे सहाच्या सुमारास महिंद्र कंपनीतून निघालेली थार गाडी गुदामाकडे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीने डिव्हायडर तोडत तब्बल तीन ते चार पलट्या घेत उलटली. गाडीचे विविध सुटे भाग रस्त्यावर विखुरलेले दिसत होते. सुदैवाने चालकाला काही झाले नाही.