सटाणा- वाहतूक कोंडीतून शहराला कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी वरदान ठरणाऱ्या शहर बाह्यवळण (बायपास) रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहर बाह्यवळण रस्त्याच्या ‘डीपीआर’ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यानंतर रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू होणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.