वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘सावाना वाचन कट्टा’

वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘सावाना वाचन कट्टा’
Published on: 
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘सावाना वाचन कट्टा’ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना) यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १५) ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी सहाला परिसरातील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ‘सावाना वाचन कट्टा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, वाचकांना आपल्या आवडत्या पुस्तकांबद्दल व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळावे आणि पुस्तकांमधील विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कट्ट्यावर वाचकांना आपल्या आवडत्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करता येणार असून, पुस्तकातून मिळालेले अनुभव, विचार आणि प्रेरणा इतर वाचकांसमोर मांडता येणार आहेत. ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनाची आवड जोपासण्याबरोबरच विविध विषयांवरील पुस्तकांमुळे समृद्ध होणारे विचारविश्व आणि वाचकांमधील संवादाला चालना देण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे. कार्यक्रमात वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव गिरीश नातू, सहायक सचिव जयेश बर्वे, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com