ईदगाह मैदान वाचविण्यासाठी आंदोलन

ईदगाह मैदान वाचविण्यासाठी आंदोलन
Published on: 
फोटो : H33258 ------------ गोल्फ क्लब खेळाडूंसाठी राखीव ठेवा मैदान बचाव कृती समितीतर्फे महापालिकेवर धडक मोर्चा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : येथील गोल्फ क्लब मैदान खेळाडूंसाठी राखीव ठेवावे आणि व्यावसायिक वापर थांबवावा, या मागणीसाठी मैदान बचाव कृती समितीतर्फे गुरुवारी (ता. २२) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सकाळी गोल्फ क्लब मैदानापासून निघालेला मोर्चा त्र्यंबक नाका, सीबीएस, बाफना ज्वेलर्स मार्गे राजीव गांधी भवनावर धडकला. मैदानावर व्यावसायिक प्रदर्शने, खासगी प्रशिक्षण वर्ग, ड्रायव्हिंग क्लासेसमुळे सरावात अडथळा येत असल्याचा आरोप खेळाडूंनी केला. महापालिका आयुक्त मनिषा खत्री आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासोबत प्रतिनिधींची चर्चा झाली. दोन्ही प्रवेशद्वारांना कुलूप, ड्रायव्हिंग क्लासेसना बंदी, पोलिस भरतीच्या खासगी कोचिंगमुळे होणारा वापर नियंत्रित करणे आणि दीर्घकालीन व्यावसायिक प्रदर्शनांना परवानगी न देण्याबाबत प्रशासनाने दक्षता घेण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाला नगरसेविका हेमलता पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, अनुप खैरनार, अंनिसचे कृष्णा चांदगुडे, शेतकरी नेते सोपान कडलग, कुतुबुद्दीन मर्चंट, मुजफ्फर सय्यद, दीपक खैरनार, महेश बोधले, हितेश गुजराती, तेजस कांबळे, संकेत घाटे, आदिल शेख, हेमंत एकबोटे यांनी पाठिंबा दिला. कृती समितीचे संतोष गायकवाड, प्रफुल्ल वाघ, विजय पाटील, राजू गामणे, महेश कदम, सोहेल शेख, झुबेर शेख, अमोल गुणवंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मैदान हा तरुणांच्या क्रीडा स्वप्नांचा आधार असून, लढा सुरूच राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. ---------------------
Marathi News Esakal
www.esakal.com