कॉँग्रेस पत्रकार परिषद

कॉँग्रेस पत्रकार परिषद
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 33465 धुळे : ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत दिल्लीत होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाची माहिती देताना काँग्रेसचे निरीक्षक हिम्मतसिंग पवार. शेजारी राजाराम पानगव्हाणे, युवराज करणकाळ, साबीर शेख, भा. ई. नगराळे, रमेश श्रीखंडे आदी. -- ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत दिल्लीत आंदोलन -- निरीक्षक पवारांची माहिती : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : देशातील लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु असलेल्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत आगामी एक नोव्हेंबरला दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक हिम्मतसिंग पवार यांनी दिली. जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या महिनाभरापासून दिल्लीत आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. ‘एसआयआर’ प्रक्रियेत काँग्रेस पक्षाच्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळून षडयंत्र रचल्याचा आरोप पवार यांनी केला. एनडीए सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संगनमताने मतचोरी केली आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा ज्ञानेश कुमार यांना पाठीशी घालत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात खुद्द अन्य दोन निवडणूक आयुक्तांनीच तक्रारी केल्याने यातील गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे. भविष्यात असे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील. संविधान, देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे हे अभियान सुरू असून याला जनसमर्थन मिळत असल्याचा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, शहराध्यक्ष साबीर शेख, ज्येष्ठ नेते भा. ई. नगराळे, रमेश श्रीखंडे, सुधीर जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com