चोपडा शहरात कॉंग्रेसतर्फे जनजागृती

चोपडा शहरात कॉंग्रेसतर्फे जनजागृती
Published on: 
CPD26B08611 चोपडा ः ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत निदर्शने करताना काँग्रेस पदाधिकारी. --- चोपडा शहरात कॉंग्रेसतर्फे जनजागृती --- ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत पदयात्रा सकाळ वृत्तसेवा चोपडा, ता. २५ ः येथे काँग्रेसतर्फे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत पदयात्रा काढून जनजागृती करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचे संरक्षण, भारतीय संविधानाचे महत्त्व आणि प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा नागरिकांचा महत्त्वपूर्ण अधिकार असून, या अधिकाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेदरम्यान लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे, रमेश शिंदे, मधुकर बाविस्कर, के. डी. चौधरी, नंदकिशोर सांगोरे, संजीव सोनवणे, नगरसेवक रमाकांत ठाकूर, अमोल पाटील, नगरसेविका वंदना पाटील, वंदना बाविस्कर, शशिकांत साळुंखे, राजेंद्र पाटील, यशवंत खैरनार, शांताराम लोहार, प्रकाश पाटील, छन्नू पाटील, देवकांत चौधरी, सारंग महाजन, सुमित पाटील, सुधाकर बाविस्कर, भरत पाटील, नितीन पाटील, इस्तियाक शेख, लक्ष्मण कविरे, मुकेश पावरा, वरुण कोळी, सागर पाटील, भूपेश पाटील, विनय कोळी, राहुल पाटील, अमोल पाटील, मुकेश पाटील, मयुर शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com