Nashik News : बचतगटांना मिळणार 80 फॅब्रिकेटेड शॉप; नावीन्यपूर्ण योजनेतून साडेतीन कोटींची मान्यता

self help group
self help group

Nashik News : जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून बचत गटांना मालाच्या विक्रीसाठी ८० फॅब्रिकेटेड शॉप देण्याचा निर्णय पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता. २६) झालेल्या ‘डीपीडीसी’च्या बैठकीत घेतला.

त्यासाठी ३.३७ कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे फॅब्रिकेटेड शॉप प्रत्येक तालुक्यातील बचतगटांना दिले जाणार असून, तेथे त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करता येईल.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ऑगस्टमध्ये बचत गटांच्या निधीतून नाशिक पंचायत समितीत एक फॅब्रिकेटेड शॉप उभारले आहे. (Savings groups will get 80 fabricated shop nashik news)

या ठिकाणी बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या ‘तत्त्व’ या ब्रॅण्डच्या नावाने साड्यांची विक्री केली जाते. याशिवाय, बचत गटांनी तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत, याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

या फॅब्रिकेटेड शॉपच्या उद्‍घाटनप्रसंगी पालकमंत्री भुसे यांनी जिल्हाभरातील बचत गटांच्या महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू स्थानिक पातळीवर विक्रीसाठी कायमस्वरूपी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार श्री. भुसे यांनी बचत गटांना वस्तू विक्रीसाठी फॅब्रिकेटेड शॉप देण्याचा निर्णय घेतला.

यात दोन प्रकारचे फॅब्रिकेटेड शॉप देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दहा मोठे शॉप देण्याचा तसेच स्थानिक पातळीवर लहान आकाराचे ७५ शॉप देण्याचा निर्णय घेतला आहे.

self help group
Nashik MD Drug Case : माजी महापौर पांडेंची आज चौकशी; एमडी ड्रग्ज कनेक्शनवरून पोलिसांकडून पाचारण

मोठ्या आकाराच्या एका शॉपची किंमत साडेसात लाख रुपये प्रस्तावित करण्यात आली असून, लहान शॉपची किंमत ३.७५ लाख रुपये असेल. या शॉपबरोबरच वजनकाटा, वीजजोडणी दिली जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाईल. बचतगटांना स्थानिक पातळीवर वस्तू विक्रीसाठी हे शॉप उपयोगी ठरतील, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले.

कायमस्वरूपी उत्पादनासाठी...

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात २५ हजार बचत गटांची स्थापना झाली आहे. त्यातील आठ ते नऊ हजार महिला बचतगट सक्रिय असून, ते तयार कपडे, पापड, लोणचे, कुरडया, मसाले, हळद, तूप, गूळ, बिस्किटे, नागली, बाजरी, ज्वारी, प्रक्रिया केलेल्या वस्तू यांची विक्री करण्याचा प्रयत्न करतात. बचत गटाच्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उत्पादनात सातत्य राहत नाही. बचत गटांच्या उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हे शॉप उपयोगी ठरणार आहेत.

self help group
Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी भुजबळांची भूमिका अमान्य; संजय पवारांनी सोडली राष्ट्रवादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com