लासलगाव- वांद्रे येथील श्री संत सेना नाभिक समाज श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे राज्य नाभिक महामंडळाच्या राज्यातील सहा विभागांतील ३६ जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोल्हापूर येथील सयाजीराव झुंजार, कार्याध्यक्षपदी नागपूर येथील श्याम आस्करकर यांची सर्वानुमते निवड झाली.