खटपट युवा मंच तर्फे एक वस्त्र व एक करंजी मोलाची..!

खटपट युवा मंच तर्फे एक वस्त्र व एक करंजी मोलाची..!
Published on: 
YEO26B27502 सायगाव : गोरगरिबांना फराळ वाटप करताना कार्यकर्ते. -------------- ३६-२ खटपट युवा मंचतर्फे एक वस्त्र, एक करंजी सायगाव, नागडे येथे आदिवासी कुटुंबांना मदत सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१३ : येथील खटपट युवा मंच आणि माय भारत केंद्र (नाशिक) यांच्यातर्फे दिवाळी पाडवा व भाऊबिजेनिमित्तत''एक वस्त्र मोलाचे आणि एक करंजी मोलाची’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुमारे दीडशे आदिवासी व गोरगरीब कुटुंबांना नवीन वस्त्रे आणि फराळाचे वाटप करून त्यांची भाऊबीज गोड करण्यात आली. सेंधवा (मध्य प्रदेश) येथून मोलमजुरीच्या शोधात आलेले सायगाव फाटा व नागडे परिसरातील प्राथमिक शाळेसमोर राहणारे आदिवासी कष्टकरी बांधव, तसेच येवल्यातील शनि मंदिर आणि गोशाळा मैदान परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांपर्यंत हा उपक्रम पोहोचला. या कुटुंबांना साड्या, लहान मुला-मुलींचे शर्ट-फ्रॉक, उबदार कपडे यांसह करंजी, लाडू, बर्फी, शंकरपाळे, फरसाण आणि चिवड्याचे सीलबंद पाकिटे भेट देण्यात आली. यासाठी शहरातील नागरिक तसेच शीतल कला पैठणी, सर्वांनी कलेक्शन, हाबडे क्लॉथ स्टोअर्स, कृष्णा फरसाण, दिलीप पावटेकर आणि जगदीश हाबडे यांनी विशेष सहकार्य केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड मंचचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, खटपट युवा मंचचे अध्यक्ष व आयोजक मुकेश लचके, कुलस्वामिनी जय यमाई माता सेवा भक्त परिवाराचे सेवेकरी नितीन सयाम, वरद लचके, कृष्णा जेजुरकर, सचिन उशीर, पंकज सांबर, दत्ता कोटमे, मयूर पारवे, प्रफुल्ल कांबळे आणि मंगेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.