Nashik Water Supply Scheme: डावा कालवा बंद केल्याने पाणीपुरवठा योजना प्रभावीत

Discharge from the embankment due to closure of Girna Dava Canal.
Discharge from the embankment due to closure of Girna Dava Canal.esakal

लखमापूर : बागलाण तालुक्यात दुष्काळाची दाहकता बघता पाटबंधारे विभागाने पाण्याची नियोजन करण्याची गरज होती.

परंतु याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने आणि ठेंगाडा येथील बंधाऱ्यावर असलेला गिरणा डावा कालवा बंद असल्यामुळे कालव्यावरील बारागाव पाणी योजना ५० टक्के तर तळवाडे, मालेगाव पाणीपुरवठा साठवण तलावाची पाणी पातळी सहा ते सात फुटाने पातळी कमी झाली आहे. (Scheme Closure of left canal will make water supply scheme effective nashik)

पाटबंधारे विभाग गिरणा ठेंगोडे बंधाऱ्यातून पाण्याची उपलब्धता असून सुद्धा गिरणा डावा काला बंद ठेवला आहे. साधारणतः प्रत्येक खरीप हंगामात गिरणा नदी पात्रातून येणारे पाणी मालेगाव पिण्याच्या पाण्यासाठी तर डाव्या कालव्यावरील पेजल योजनांना वापरून पिण्याच्या पाण्यासाठी सनकापूर धरणातून सोडण्यात येणारे आवर्तन जेवढे दिवस पुढे ढकलता येईल त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असते.

याचा फायदा पुढील रब्बी हंगामात शेतीसाठी आवर्तन देण्यासाठी मदत होत असे. परंतु यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती असताना आणि पाटबंधारे विभागाने ठेंगोडा बंधाऱ्यावरून पाणी वाया जात असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

आज रोजी ठेंगोडा बंधाऱ्या भरल्यानंतर तीन दिवस कालवा सोडला तर पाणी चालते. सद्य:स्थितीत ठेंगोडा बंधारा ८० ते १०० क्युसेकचा विसर्ग होत असताना पाटबंधारे विभाग कालवा सुरू करण्यासाठी दुर्लक्ष करत आहे.

Discharge from the embankment due to closure of Girna Dava Canal.
Nashik Water Crisis: मोसम खोऱ्यात रब्बी हंगाम धोक्यात! जलसाठे कोरडेठाक; खरीप पिकांचेही नुकसान

यामुळे या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावे, आणि शेतीवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे डावा कालवा चालू करण्याची मागणी ब्राह्मणगाव, लखमापूर ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.

"भीषण दुष्काळ असल्यामुळे आतापासूनच पेयजल योजना प्रभावित आहेत. पुढील काळात पाण्याचा प्रश्न गंभीर समस्या होणार आहे. अशा परिस्थिती पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तत्काळ डावा कालवा सुरू करावा."-दिलीप दळवी, मविप्र चिटणीस

"पाटबंधारे विभाग विभाग पाण्याच्या नियोजनाबाबत गंभीर नसल्यामुळे भविष्यात परिस्थिती गंभीर होणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता असताना पाणी वाया जात असून गिरणा डावा कॅनॉल बंद ठेवला आहे. जनतेच्या भावनांचा व परिस्थितीचा विचार करता गिरणा डावा चालू करण्यात यावा."- ज्ञानदेव अहिरे, ब्राह्मणगाव

Discharge from the embankment due to closure of Girna Dava Canal.
Nashik: सभापती संजय पवारांकडून मराठा समाजाची फसवणूक; सह्यांचे अधिकार काढून घेण्याची संचालक मंडळाची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com