(पान ४ ला ॲंकर)
KPD26B13576
खलाणे : सचिवालय अधिकारी गुणवत्ता तपासणी करताना.
--------
मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी
खलाणे शाळेची गुणवत्ता तपासणी; थेट वर्गात जावून मूल्यमापन
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ३१ : खलाणे (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद शाळेला मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यानिमित्त अचानक भेट दिली. शाळेच्या भौतिक सुविधा व गुणवत्तेची पाहणी केली. थेट वर्गात जावून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले.
सचिवालयातील कक्ष अधिकारी वीणा रानडे व सल्लागार ऋषिकेश केळुसकर यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेतील इमारत, सजावट, संरक्षक भिंत, वर्ग व्यवस्था, पिण्याचे पाणी, मुला- मुलींसाठी स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत किचन शेड, धान्याची गुणवत्ता, हॅन्ड वॉश स्टेशन, डिजिटल रूम, संगणक कक्ष, परसबाग आदींची पाहणी केली. इंटरॲक्टिव्ह स्मार्ट बोर्डद्वारे सुरू असलेल्या अध्यापनाचे निरीक्षण केले. चौथीतील विद्या भिलने इंग्रजी व मराठी सुंदर अक्षर लेखन व प्रकट करून दाखवले. शादाब फकीर या विद्यार्थ्याने ३९ चा पाढा आत्मविश्वासाने तयार करून दाखवला. वर्गशिक्षिका कविता पवार यांनी निपुण उपक्रमाची माहिती दिली. रानडे यांनी शाळेच्या कामकाजाचे, भौतिक सुविधा व गुणवत्तेचे कौतुक केले. केळुसकर यांनी लोकसहभागाचे विशेष कौतुक करीत इतर शाळांनीही असा सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे, केंद्रप्रमुख तृप्ती जाधव, भूषण सूर्यवंशी, राजेंद्र कढरे, मुख्याध्यापक शरद पाटील, उपशिक्षक राकेश पाटील, वैशाली शिंदे, मनीषा बोरसे, कविता पवार, प्रिया सांगळे, प्रवीण सोनवणे, बाळू गिरासे, रोहन गिरासे आदी उपस्थित होते.