esakal | १४ जूनपासून शाळा होणार सुरू; अशी असेल खबरदारी

बोलून बातमी शोधा

school
१४ जूनपासून शाळा सुरू; अशी असेल खबरदारी
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना महाराष्ट्र दिनापासून (ता. १) उन्हाळ्याची सुटी सुरू होईल. उन्हाळ्याची सुटी १३ जूनपर्यंत राहणार असून २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील राज्यातील शाळेचा पहिला दिवस १४ जून हा राहील. दरम्यान, विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू होतील. विशेषत: नाशिकमध्ये देखील याची खबरदारी घेतली जाणार असून माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा अधिक राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकला आजपासून उन्हाळ्याची सुटी

उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांसाठी ती वापरण्याची परवानगी जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी देऊ शकतील. माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा अधिक राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सध्या राज्यातील सर्व महापालिका, पालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय बंद आहेत. २०२१-२२ मध्ये शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोरोना प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारतर्फे देण्यात येणारे आदेश शिक्षण संचालनालयातर्फे जारी होणार आहेत.

जिल्हास्तरावर माहिती

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयातर्फे दर वर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्यांची निश्‍चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत सर्व मान्यताप्राप्त सरकारी, खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, सैनिकी शाळांना शुक्रवारी शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी जिल्हास्तरावर माहिती कळवली आहे.