सायटिका : वेदना फक्त कंबरेत नसते!
कंबरदुखी सुरू झाली की अनेकदा ती साधी पाठदुखी समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, कंबरेपासून नितंब, मांडी, पोटरी किंवा पायापर्यंत जाणारी वेदना, मुंग्या, झिणझिण्या, जळजळ, पायात जडपणा किंवा चालताना होणारा त्रास ही लक्षणे सायटिकाची असू शकतात. त्यामुळे सतत किंवा वाढत जाणाऱ्या अशा वेदनांकडे दुर्लक्ष न करता त्यामागील कारण समजून घेणे आवश्यक आहे.
- डॉ. नीरज गुजराथी
सायाटिक नर्व्हवर दबाव किंवा जळजळ झाल्यास वेदना पायापर्यंत जाणवू शकतात. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे, चुकीची बसण्याची पद्धत, अचानक वजन उचलणे, पाठ वाकवून काम करणे तसेच काही प्रकारच्या डिस्कच्या समस्यांमुळे हा त्रास उद्भवू शकतो. मात्र, प्रत्येक रुग्णामध्ये कारण आणि लक्षणांची तीव्रता वेगळी असू शकते. त्यामुळे केवळ वेदना कमी करण्याऐवजी वेदनांचे मूळ कारण शोधणे, योग्य मूल्यांकन करणे आणि व्यक्तीनुसार उपचारपद्धती ठरवणे महत्त्वाचे ठरते. रुग्णाची दैनंदिन जीवनशैली, पूर्वीचे वैद्यकीय अहवाल आणि सध्याची लक्षणे यांचा विचार करून उपचाराचे नियोजन केल्यास त्याचा अधिक परिणामकारकपणे पाठपुरावा करता येतो.
लोटस ब्ल्यू आयुर्वेद ॲन्ड वेलनेस येथे ‘३० दिवसांचा सायटिका रोगमुक्ती कार्यक्रम’ अंतर्गत रुग्णाच्या तक्रारी, पूर्वीचे रिपोर्टस्, जीवनशैली आणि आवश्यक मूल्यांकन यांचा विचार करून वैयक्तिक आयुर्वेदिक उपचार योजना तसेच नियमित पाठपुरावा यावर भर दिला जातो. कंबरदुखी पायापर्यंत जात असेल, मुंग्या किंवा झिणझिण्या जाणवत असतील किंवा जास्त वेळ बसताना, चालताना त्रास होत असेल, तर वेदना वाढण्याची वाट न पाहता तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.