इंदिरानगर- शहरीकरणामुळे संपूर्ण वडाळा गाव शहरात आले असताना गावात अजूनही असलेले म्हशींचे गोठे आणि भंगार गुदामामुळे गावाची रया जात असून याबाबत आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. शिवाजी वाडीपासून जेएमसीटी महाविद्यालयाच्या रस्त्याने निघाले की म्हशीचे गोठे नजरेस पडतात. तेथून येणारी दुर्गंधी आणि रस्त्यांच्या कडेलाच वाहणारे जनावरांचे मलमूत्र नजरेस पडते. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी गोठ्याबाबत त्यांच्या काळात प्रक्रिया सुरू केली होती. मात्र कालौघात कोणातही बदल झाला नाही.