Nashik: सिडकोतील पेलिकन पार्कचे दुसऱ्या टप्प्यातील काम वादात! अटी- शर्तींचा भंग करून बांधकाम विभागाने दिले काम

Pelican Park File Photo
Pelican Park File Photoesakal

Nashik News : स्मार्टसिटी कंपनीमार्फत कमांड कंट्रोल सेंटरचे काम देताना अटी- शर्ती भंग झाल्याचा प्रकार मागील आठवड्यात उघड झाल्यानंतर त्यापाठोपाठ आता सिडकोतील वादग्रस्त ठरत असलेल्या पेलिकन पार्क अर्थात सेंट्रल पार्कचे दुसऱ्या टप्प्यातील काम वादात सापडले आहे.

१८ कोटींचे काम देताना अटी व शर्तींचा भंग झाला असून, याविरोधात काही माजी नगरसेवकांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. (second phase of Pelican Park in CIDCO under controversy work given by construction department in violation of terms conditions Nashik)

सिडकोतील पेलीकन पार्कच्या १७ एकर जागेत शासनाच्या निधीतून सेंट्रल पार्क उभारले जात आहे. सेंट्रल पार्कसाठी राज्य शासनाने विशेष निधीची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १८ कोटींची कामे केली जाणार आहे.

सदर १८ कोटींची कामे देताना विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून बांधकाम विभागात रिंग झाली असून, कामे देताना अटी व शर्तींचा भंग झाला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने या संदर्भात कानावर हात ठेवले आहे.

सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्यांचे काम देताना अटी व शर्तींचा भंग झाल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. ज्या ठेकेदाराला पात्र ठरविण्यात आले, त्या ठेकेदाराने दाखविलेला तीन वर्षाचा निव्वळ नफा वादात आहे.

प्रकल्पाच्या किमतीचा विचार करता ठेकेदाराची तेवढी क्षमता नसल्याचा संशय आहे. संबंधित ठेकेदाराने ॲडव्हेंचर पार्कसाठी स्वतंत्र कंपनी संलग्न करण्याच्या अटीचा भंग केल्याचा संशय आहे.

असे असताना महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला पात्र ठरविले. ३ ऑक्टोबरला निविदा अंतिम होणार असताना बांधकाम विभागाने सर्व प्रक्रिया एकाच दिवशी पार पाडून निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या इतर स्पर्धकांना बाद ठरविल्याचा संशय आहे.

Pelican Park File Photo
Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावरून मशाली प्रज्वलीत करून मंडळे रवाना; उद्यापासून नवरात्रोत्सव

कमी दराचे ठेकेदार अपात्र

निविदा उघडल्यानंतर ज्या ठेकेदाराने कमी दराची निविदा भरली आहे, ते ठेकेदार पात्र करणे अपेक्षित असताना १० ते १२ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखविणारे ठेकेदारच अपात्र ठरविण्याची कामगिरी बांधकाम विभागाने केली.

तांत्रिक कारणे देऊन कमी दराने काम करण्याची तयारी दाखवणाऱ्या कंपन्यांना खुलासा करण्याची संधीदेखील बांधकाम विभागाने दिली नाही.

या कामावरून संशय

सेंट्रल पार्कमध्ये इंटरन्स प्लाझा, अमुजमेंट पार्क, फूड कोर्ट, सायनेस बोर्ड, बेंचेस, डस्टबिन, स्टेज लाइट, साऊंड व्यवस्था, सुलभ टॉयलेट ब्लॉक, पार्किंग, ॲडव्हेंचर पार्क, पिण्याचे पाणी या कामांसंदर्भात संशय व्यक्त केला जात आहे.

Pelican Park File Photo
Nashik Kalika Yatrotsav : दररोज दीड लाख भाविकांच्या हजेरीची शक्यता; यात्रोत्सवात 50 सीसीटीव्ही, 40 महिला बाऊन्सर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com