Agitation
Agitationesakal

Nashik Teacher Protest: माध्यमिक शिक्षकांचे उद्या धरणे आंदोलन

Nashik Teacher Protest : शिक्षकांच्या प्रलंबित फरक बिलांसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षक संघटनांतर्फे गुरुवारी (ता. १०) नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर दुपारी दोन ते सायंकाळी पाच, या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (Secondary teachers protest tomorrow nashik)

गेल्या पाच-सहा वर्षांपासून फक्त नाशिक जिल्ह्यातीलच विविध प्रलंबित (वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी वेतनातील फरक, मेडिकल बिले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची विविध फरक) मागण्या मोठ्या प्रमाणावर आहेत.

हा प्रश्न मार्गी लागावा व इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा शिक्षक सेना, नाशिक जिल्हा शिक्षक भारती,

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा शिक्षक परिषद, नाशिक जिल्हा महाराष्ट्र शिक्षक संघटना, नाशिक जिल्हा ईस्तू संघटना, नाशिक जिल्हा शिक्षकेतर संघटना, नाशिक जिल्हा जुनी पेन्शन योजना संघटना,

नाशिक जिल्हा विनाअनुदानित संघटना, नाशिक जिल्हा कास्ट्राईब संघटना, नाशिक जिल्हा प्रयोगशाळा संघटना, नाशिक जिल्हा कला व्हिजन संघटना यांसह मोहन चकोर, संजय चव्हाण, साहेबराव कुटे,

रवींद्र मोरे, टी. एम. डोंगरे, आर. डी. निकम, अरुण पवार, बाळासाहेब ढोबळे, एस. के. सावंत, एस. बी. देशमुख, भाऊसाहेब शिरसाट, सोमनाथ धात्रक, रोहित गांगुर्डे, भारत गांगुर्डे, राजेंद्र लोंढे, किरण पगार, बी. के. सानप, विनीत पवार, सांगळे प्रदीप, एम. के. वाघ यांनी केले आहे.

Agitation
Nashik News: दीड वर्षाच्या कान्हाची मृत्यूशी यशस्वी झुंज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com