नाशिक- भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात एअर स्ट्राईक घडवून आणल्यावर नाशिकमध्ये महत्त्वाच्या स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. आर्टिलरी सेंटरमध्ये गोळीबार प्रशिक्षण सरावात वाढ करतानाच आर्टिलरीकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत..भारताने पाकिस्तानमध्ये खुलेआम दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या तळांवर मंगळवारी (ता. ६) रात्री हल्ले केल्यावर देशभरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. केंद्र सरकारचे महत्त्वाचे कारखाने व आस्थापना नाशिकमध्ये आहेत. तेथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. हिंदुस्थान एरोनोटिक्स लिमिटेड (एचएएल) या लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कारखान्यातून तज्ज्ञांची टीम देशभरातील लढाऊ विमानांच्या एअरबेसवर तैनात करण्यात आली आहे. चलार्थ पत्र मुद्रणालय, भारत प्रतिभूती मुद्रणालय, गांधीनगर प्रेस या अर्थ खात्याशी संबंधित महत्त्वाच्या आस्थापनांवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. .आर्टिलरीच्या लोहशिंगवे येथे प्रशिक्षणार्थींच्या गोळीबाराच्या प्रशिक्षणात वाढ करण्यात आली. आज सकाळी या भागात तोफांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. मनमाड येथे मराठवाड्याला पुरवठा करण्यासाठी धान्य व इंधनाच्या साठ्याच्या गुदामांवर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली. रेल्वे इंजिन कारखाना, एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, मनमाड व नाशिक रोड रेल्वेस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे..आपत्तीच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्जनाशिक- भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ‘पीओके’त मंगळवारी (ता. ६) मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदुर’ राबवत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. केंद्र सरकारने या ऑपरेशननंतर देशभरात हाय अलर्ट घोषित केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले. केंद्राकडून तूर्तास नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. परंतु, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली..एलओसी भागात पाकिस्तानकडून गोळीबार केला जात असून, भारतातर्फे त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तसेच, पाकिस्तानतर्फे हवाई हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्राकडून सर्व राज्यांना सज्जतेचे आदेश देण्यात आले. तसेच, देशभरातील २४४ ठिकाणी बुधवारी (ता. ७) मॉकड्रिलही घेण्यात आले. त्यात नाशिकमध्येही मॉकड्रिलच्या माध्यमातून आपत्तीजन्य परिस्थितीत यंत्रणांच्या सज्जतेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मात्र, ‘पीओके’तील हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून कोणत्याही नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्पष्ट केले. पण, तसे आदेश आल्यास त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की नाशिकमध्ये आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास त्याचा प्रतिकार करण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज आहेत. जिल्हा प्रशासनासह पोलिस, नागरी संरक्षण दल, आरोग्य, अग्निशमन, ‘एनएसएस’ व ‘एनसीसी’ यांसारख्या यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तयारी केली असल्याचे शर्मा यांनी सांगितले..सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णयनाशिक शहरात ड्रोन उडविण्यावर बंदीआर्टिलरी सेंटरमधील लष्करी विमानतळाकडे जाणारे रस्ते बंदलोहशिंगवेत गोळीबार व तोफांच्या प्रात्यक्षिकांमध्ये वाढउत्तर भारतातील कनेक्टिंग विमानसेवा खासगी कंपन्यांकडून बंदनागरी संरक्षण दलाकडून मॉक ड्रिलनागरी भागात लष्करी हेलिकॉप्टरची टेहेळणी.operation sindoor: भारतानं केलेल्या हल्ल्यात मोठा अतिरेकी ठार, पण नेमका कोण?| Terrorist Died.वेळोवेळी सूचना देऊपाकिस्तानवरील हल्ल्यानंतर देशभरातील यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर आल्या. नाशिकमध्येही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचना वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतील. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.