नाशिक- शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागाकडून बालहक्क सुरक्षाप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राज्यातील ४९७ शासकीय आश्रमशाळा बालमैत्रीपूर्ण होणार आहेत. प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सात स्वयंसेवी संस्थांसोबत तीन वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे.