नाशिक- अलीकडच्या काही वर्षांत वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, यामागील एक महत्त्वाचा कारणीभूत घटक म्हणजे आपल्या जीवनशैलीत झालेला मोठा बदल हा आहे. अनियमित झोप, सततचा तणाव, वेळेत न होणारे खाणे, व्यायामाचा अभाव आणि तंत्रज्ञानाने भरलेले बैठी जीवनशैली हे सगळे केवळ शरीरावरच नव्हे, तर प्रजनन क्षमतेवर अर्थात फर्टिलिटीवर देखील खोलवर परिणाम करत आहे.