esakal | महाडीबीटी’वर बियाणे अनुदान योजनेसाठी अर्जासाठी मुदत; 'या' संकेतस्थळावर नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

farmers

महाडीबीटी’वर बियाणे अनुदान योजनेसाठी अर्जासाठी मुदत; 'या' संकेतस्थळावर नोंदणी

sakal_logo
By
गौरव परदेशी

खेडभैरव (जि.नाशिक) : राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर (MahaDBT) बियाणे अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना (farmers) आता २० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. (seed subsidy scheme on MahaDBT)

प्रतिकिलो १२ रुपये अनुदान मिळणार

विशेष म्हणजे, सोयाबीनसाठी प्रतिकिलो १२ रुपये अनुदान मिळणार आहे. बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. बियाणे अनुदान सर्व जिल्ह्यांत सरसकट मिळणार नाही. विशिष्ट बियाण्यांसाठी विशिष्ट जिल्ह्यांत अनुदान मिळेल. नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत भातासाठी, तर कडधान्यासाठी सर्व जिल्ह्यांत अनुदान मिळेल.

मका, बाजरीला शंभर रुपये अनुदान

पिकानुसार निवडलेल्या संबंधित जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यांसाठी दहा वर्षांआतील वाणास प्रतिकिलो २० रुपये, दहा वर्षांवरील वाणास दहा रुपये अनुदान मिळेल. कडधान्य बियाण्यांसाठी दहा वर्षांआतील वाणास ५० रुपये, दहा वर्षांवरील वाणास २५ रुपये मिळतील. मात्र संकरित मका व बाजरी बियाण्यांसाठी दहा वर्षांआतील वाणास शंभर रुपये मिळणार आहेत. ऑनलाइन लॉटरीत निवडलेल्या शेतकऱ्याला तूर, मूग, उडीदपैकी एका पिकाचे चार किलोचे एक बियाणे मिनी किट मिळणार आहे. यात प्रति चार किलोच्या तुरीच्या किटसाठी ४१२ रुपये, मुगासाठी ४०७ रुपये, उडीदसाठी ३४९ अनुदान असेल. बियाणे मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम मात्र शेतकऱ्यांनी द्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना नोंदणीबाबत कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर किंवा ०२० २५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

हेही वाचा: नाशिकच्या बिटको हॉस्पीटलची 'ही' घटनाही वाऱ्या‍सारखी पसरली!

बियाणे मिनी किट चार किलोचे

सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनी किट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य असेल. तुरीच्या मिनी किटसाठी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, जळगाव, नंदुरबार, धुळे, सांगली, सातारा, नगर, नाशिक, सोलापूर, तर मुगासाठी जळगाव, धुळे, नगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, तसेच उडीदसाठी नगर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोल्याचा समावेश आहे.

हेही वाचा: आदिवासी भागातही आता मोबाईल टॉवर्स! नेटवर्कअभावी विद्यार्थ्यानी केली होती आत्महत्या

सोयाबीनला मिळणार १२ रुपये

ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यांसाठी दहा वर्षांआतील वाणास प्रतिकिलो ३० रुपये, दहा वर्षांवरील वाणास १५ रुपये मिळतील. सोयाबीन बियाण्यासाठी दहा ते १५ वर्षांच्या वाणास १२ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांसाठी दोन हेक्टरपर्यंत एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादित अनुदान दिले जाणार आहे.

loading image