Nashik: दहेगाव शिवारातील संशयास्पद मृतदेह प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी; सीमा हिरेंचे फडणवीसांना निवेदन

seema hire giving statement to fadanvis
seema hire giving statement to fadanvisesakal

Nashik News : नाशिक पश्चिम मतदार संघातील सिडको परिसरातील रहिवासी अभिजित सामरे यांचा संशयास्पद मृतदेह नागपूर मुंबई रस्त्यालगत दहेगाव शिवारात आढळून आला होता.

हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय असल्याने आमदार सीमा हिरे यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. (Seema Hire statement to Fadnavis Suspicious body found case in Dahegaon area should investigated Nashik)

कोपरगाव येथे उत्तम नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत सांबरे याचा संशयास्पद मृतदेह २८ जून,बुधवार रोजी रस्त्याच्या कडेला आढळून आला होता.

सांबरे यांच्या परिवाराने घातपाताची शक्यता वर्तवली आहे. सहा दिवस उलटूनही संशयित मारेकरी अद्यापही मोकाट फिरत असून सांबरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित ताब्यात घेण्यात यावे अशी मागणी सांबरे यांच्या परिवाराने केली आहे.

उत्तम नगर येथील अभिजीत सांबरे यांचा नागपूर मुंबई रस्त्यालगत दहेगाव शिवारात मृतदेह बुधवारी आढळून आला होता याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

seema hire giving statement to fadanvis
Pune Crime : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

'मात्र सांबरे यांचा घातपात झाला चा संशय परिवाराने तसेच मित्रमंडळी यांनी आमदार सिमा हिरे यांच्याकडे केला होता.

सांबरे यांचे मारेकरी मोकाट फिरत असून त्या अनुषंगानेच तपास व्हायला हवा याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार सिमा हिरे यांनी या बाबत निवेदन देत मयत अभिजित सांबरे यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी अधिक तपास करून संशयीतांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याकरता संबंधितांना आपल्या स्तरावरून उचित निर्देश देण्यात यावे याबाबत विनंती करण्यात आली आहे.

seema hire giving statement to fadanvis
Crime: शेत रस्त्यासाठी ४० हजाराची मागणी केल्याने तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com