मानवी आरोग्यास घातक पॅराफीनची दुधात भेसळ; मोठा साठा जप्त

Seize large stocks of paraffin used to adulterate milk
Seize large stocks of paraffin used to adulterate milk esakal

सिन्नर (जि. नाशिक) : मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या पॅराफीन (Paraffin) सदृश्य रसायनाची गाईच्या दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्या दूध संकलन केंद्र चालकासह चार जणांच्या विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई करून ही बाब उघडकीस आणली आहे.

'पॅराफीन' मानवी आरोग्यास अत्यंत घातक

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ याचे श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र आहे. पाथरे व परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले गाईचे दूध तो जवळके तालुका कोपरगाव येथील न्यू शनेश्वर दूध संकलन केंद्रात विकतो. दूध व्यवसायात अधीकचा नफा कमावण्यासाठी अक्षय शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधामध्ये 'पॅराफीन' पावडर, सोयाबीन रिफाईंड तेल आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या 'पॅराफीन' सदृश्य रंगहीन रसायनांची भेसळ करून जवळके येथील दूध संकलन केंद्रात विक्री करत असल्याचा प्रकार नाशिक येथील अन्नभेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत उघड झाला. पॅराफीन रसायनाचे प्रत्येकी चाळीस लिटरचे आठ ड्रम या कारवाईत अक्षय गुंजाळ याचे जवळून जप्त करण्यात आले आहेत. अक्षय याने हे रसायन शेख नामक व्यक्तीसह उजनी ता. सिन्नर येथील हेमंत पवार या इसमाकडून विकत घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी वावी पोलीस ठाण्यात वरील चौघांच्या विरोधात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Seize large stocks of paraffin used to adulterate milk
नाशिक : जवान विलास शिंदे यांचे अपघाती निधन; परिसरात हळहळ

प्रशासन 'या' व्यावसायिकांना पाठीशी घालतय?

या गुन्ह्यात नाव असलेल्या हेमंत पवार याच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी सिन्नर एमआयडीसी पोलीसांनी मोठी कारवाई करून दुधात भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पावडरचा मोठा साठा जप्त केला होता. ही कारवाई झाल्यानंतर जप्त केलेल्या पावडरचे नमुने अन्न भेसळ व सुरक्षा विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, यावेळी मोठी रक्कम देऊन हे प्रकरण मिटवण्यात आल्याची चर्चा होती. संशयित पवार यांचा दुधात भेसळसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायन विक्रीचा व्यवसाय असल्याची सिन्नर परिसरात चर्चा आहे. पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून पाठीशी घातले जात असल्याने त्याचा हा व्यवसाय चांगलाच फोफावला असल्याचे बोलले जात आहे.

Seize large stocks of paraffin used to adulterate milk
अजून किती मृत्यूची वाट पाहणार? खासदारांचा महामार्ग प्राधिकरणाला इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com