Latest Marathi News | महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या प्रचिती भवरची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prachiti Bhavar

Nashik Sports News : महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या प्रचिती भवरची निवड

नाशिक : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रचिती भवरची पंधरा वर्षांखालील महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे रांची येथे खेळविल्‍या जाणाऱ्या ५० षटकांच्‍या एकदिवसीय सामन्यांच्‍या स्‍पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्‍व करणार आहे. (Selection of Nashik Prachiti Bhawar in Women Maharashtra Cricket Team Nashik Sports News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून 28 हजारांचा नायलॉन मांजा जप्त

उजव्या हाताने फलंदाजी करणारी प्रचिती अष्टपैलू खेळाडू असून ऑफ स्पिन गोलंदाजी करते. प्रचितीच्या निवडीमुळे सध्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या पुरुष व महिलांच्या सर्वच वयोगटात नाशिकच्या क्रिकेटपटू राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत प्रतिनिधित्व करत आहेत.

या स्‍पर्धेतील साखळी सामने उद्या (ता.२६) पासून ३ जानेवारीदरम्यान रांची येथे खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्र संघाची लढत उद्या (ता.२६) मुंबई संघासोबत होईल. बुधवारी (ता.२८) वडोदरा, ३० डिसेंबरला हरियाणा, १ जानेवारीला पुदुचेरी, आणि ३ जानेवारीला छत्तीसगड संघासोबत लढत होणार आहे.

हेही वाचा: Nashik Christmas Natal : शांतता, एकोपा, प्रेम तारेल जगाला