
नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी १९ वर्षाआतील गटाच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतात खेळविल्या जाणाऱ्या या मालिकेत एकदिवसीय व चार दिवसांचे कसोटी सामने खेळविले जातील. यात एकदिवसीय सामन्यांसाठी भारताच्या संघात नाशिकच्या साहिल पारखची निवड झाली आहे. साहिल डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. (Selection of Nashik Sahil in Indian Cricket Team)