Nashik CM Fellowship : 'मुख्यमंत्री फेलोशिप' साठी सचिन कळमकरची निवड

Selection of Sachin Kalamkar for Chief Minister Fellowship nashik news
Selection of Sachin Kalamkar for Chief Minister Fellowship nashik newsesakal

Nashik News : राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री फेलोशिप ' या उपक्रमात खडकी (ता.मालेगाव) येथील सचिन काशिनाथ कळमकर या युवकाची निवड झाली आहे. सातत्याने अभ्यास करण्याची जिद्द असली की यशाला गवसणी घालणे शक्य होते. या निवडीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांपुढे आदर्श निर्माण केला आहे. (Selection of Sachin Kalamkar for Chief Minister Fellowship nashik news)

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी देतो. या फेलोशिपसाठी राज्यातील ६० उमेदवारांची निवड झाली.

त्यामध्ये सचिनचा समावेश आहे. खडकी सारख्या अवर्षणप्रवण माळमाथा भागातील सचिन याने पुणे येथे अन्न तंत्रज्ञान विषयात पदवी मिळवली आहे. सचिन हा मुंबई येथे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स या संस्थेत लोकसंख्या या विषयावर एम.एस्सी. शिक्षण घेत आहे.

फेलोंच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची प्रशासनास मदत होते. फेलोचा उत्साह व तंत्रज्ञानाची समज यामुळे प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान व अनुभव भविष्यातील करियरसाठी फायदेशीर ठरतात.

फेलोंना शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष दर्जा व आयआयटी मुंबई येथे 'प्रभावी सार्वजनिक धोरणासाठी साधनांमध्ये पदव्युत्तर प्रमाणपत्र' किंवा आयआयएम नागपूर येथे 'सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन' या विषयात पदवी मिळणार असून दर महिन्याला सत्तर हजार रुपये मानधन व प्रवास खर्च पाच हजार देण्यात येणार असून वर्षभराच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Selection of Sachin Kalamkar for Chief Minister Fellowship nashik news
Nashik News : आंतरराष्ट्रीय निधीतून मुलींसाठी शौचालय; वावी विद्यालयासाठी नाशिकरोड रोटरी क्लबचा पुढाकार

सचिन याची कृषी विभागाच्या ठिकाणी निवड करण्यात आली असून ही बाब गौरवास्पद असल्याचे शेतकरी वडील काशिनाथ कळमकर यांनी सांगितले. मुळात अभ्यासू असलेल्या सचिनने भविष्यातील कृषी आधारित व्यावसायीक शिक्षण तसेच शासनाच्या विविध कृषी आधारित प्रकल्पांमध्ये काम करण्याचा मानस आहे. ज्यामधून ग्रामीण भागातील छोट्या शेतकऱ्यासाठी भविष्यात चांगले कार्य करता येईल व थेट शेतकरी ते ग्राहक यांच्यातील जाळे निर्माण करून शेतीसंबंधी संशोधनावर करिअर करण्याचा संकल्प केला आहे.

फेलोंची निवड प्रक्रिया:

कोणत्याही शाखेचा पदवीधर, साठ टक्के गुण, वर्षभर पूर्णवेळ कामाचा अनुभव, व्यावसायिक अभ्यासक्रम प्राधान्य, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या माध्यमातून अर्ज, भाषा ज्ञानासह संगणक ज्ञान आवश्यक, यासाठी परीक्षा, त्यानंतर चाचणी व मुलाखतीसाठी निवड करण्यात येते. देशभरातील उमेदवार यासाठी परीक्षा देऊ शकतात. मात्र महाराष्ट्रात अधिवास असलेल्या उमेदवारांना दोन गुण अधिक दिले जातात.

"आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध असताना ग्रामीण भागातील तरुण त्याकडे फारसे वळत नाही. माझ्या पुण्यातील व मुंबईतील शिक्षणाच्या अनुभवावरून कृषी आधारित व्यावसायिक शिक्षणाचा विचार आधीपासून डोक्यात ठेवून नवीन संधी शोधत होतो. त्यातून मला मुख्यमंत्री फेलोशिपची माहिती मिळाली, त्यात चाचणी परीक्षा, मुलाखत असे टप्पे पार करत उत्तीर्ण झालो. सातत्य व नवीन शोधातून वेगळे काही करता येत." - सचिन कळमकर, 'मुख्यमंत्री फेलो' निवड झालेला उमेदवार

Selection of Sachin Kalamkar for Chief Minister Fellowship nashik news
Nashik Market Committee Election : माघारी दरम्यान मनमाडला शिंदे, ठाकरे गटात हाणामारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com