ज्येष्ठाचा आत्मदहनाचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

senior citizen
senior citizenesakal

नाशिक : "मी ८० वर्षाचा सुशिक्षित बेरोजगार असून, प्रशासन माझ्या मरणाची वाट पाहत आहे, असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या समाधानासाठी आत्मदहनाची परवानगी मागत आहे." अखेरीस उदीग्न झालेल्या एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत ९ ऑगस्टला आत्मदहनासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्याचे कारण असे की....(senior-citizen-warning-of-self-immolation-to-Chief-Minister-Uddhav-Thackeray-jpd93)

ज्येष्ठाचा आत्मदहनाचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र व्यवहार

ग्रॅच्युइटीसह देय असलेली अन्य रक्कम कंपनीकडून मिळविण्यासाठी विविध कायदेशीर मार्ग अवलंबून व न्यायलयीन प्रक्रियेतदेखील रक्कम देण्याचे आदेशित होवूनही तीस वर्षांपासून सदरची रक्कम मिळत नसल्याने अखेरीस इंदिरानगर येथील रत्नाकर केशव साठे ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत ९ ऑगस्टला आत्मदहनासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. इंदिरानगर येथील रत्नाकर साठे हे सातपूर येथील लॉकडाऊन जाहीर केलेल्या कंपनीत तीस वर्षांपूर्वी काम करीत होते. १८ ऑक्टोंबर ते १९७६ ते ५ नोव्हेंबर १९८७ या अकरा वर्ष दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांना दोन हजार २८५ रुपये वेतन होते. १९ नोव्हेंबर १९८७ ला कंपनीने नोटीस देऊन कामावरून कमी केले. त्यानंतर ग्रॅच्युइटी व अन्य हक्काचे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी त्यांनी कंपनीला नोटीस पाठविली. कामगार आयुक्तांकडे दावा दाखल केला. २५ जुलै २०११ रोजी त्यावर निकाल देताना ग्रॅच्युइटीची अकरा हजार २६४ रुपये रक्कम बारा टक्के व्याजाने परत करण्याचे आदेशित करण्यात आले. परंतु, अद्याप त्यांना रक्कम मिळाली नाही. कामगार उपायुक्तांकडे पाच वर्षांपूर्वी पुन्हा दावा केला. कामगार उपायुक्तांनी ९२ लाख ६३ हजार २८७ रुपये रक्कम निश्‍चित केली. मात्र, अद्यापही सदर रक्कम न मिळाल्याने साठे यांनी ९ ऑगष्ट २०२१ च्या क्रांतिदिनी नाशिक न्यायालयात आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

senior citizen
नाशिक जिल्ह्यातील निर्बंध तूर्तास 'जैसे थे' : छगन भुजबळ

मी ८० वर्षाचा सुशिक्षित बेरोजगार असून, कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडलो आहे. पैसे मिळत नसल्याने प्रशासन माझ्या मरणाची वाट पाहत आहे, असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या समाधानासाठी आत्मदहनाची परवानगी मागत आहे.- रत्नाकर साठे, ज्येष्ठ नागरिक.

senior citizen
PHOTO : इगतपुरीत अवतरली ‘इंद्रपुरी’; तालुक्यात सर्वदूर मनमोहक चित्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com