SKD26B04374
शिंदखेडा : ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप करताना गोरख पाटील व उद्योगपती सज्जनराव जैन.
----------
शिंदखेड्यात ज्येष्ठ नागरिकांना
‘हस्ती’ बँकेतर्फे काठीचे वाटप
शिंदखेडा, ता. २३ : हस्ती को-ऑप. बँक लि. (मल्टीस्टेट बँक) चे आधारस्तंभ, कांतीलाल जैन यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त बँकेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील व उद्योगपती सज्जनराव जैन यांच्या हस्ते शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप करण्यात आले.
मान्यवरांनी कांतीलाल जैन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ नागरिक आत्माराम मिस्तरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष मदन जैन, दोंडाईचा शाखा समितीचे चेअरमन किशोर जैन, उद्योगपती अशोक जैन, उपाध्यक्ष संजय दुग्गड, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. शाखा समितीचे चेअरमन प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य हितेंद्र जैन, समितीचे उपाध्यक्ष अनिल वानखडे, सदस्य ॲड. अशोक गुजराथी, मनोहर भोजवानी, गिरीश टाटिया, शाखा अधिकारी राहुल मराठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी मनीषा काळे, मोनाली बागल, नरेश जाधव, महेंद्र माळी, भीमराव कोळी, रवींद्र भलकार, सुनील वाणी, जयंत पाटील व विशाल कोळी यांनी परिश्रम घेतले. प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हितेंद्र जैन यांनी प्रास्ताविक केले. शाखाधिकारी राहुल मराठे यांनी आभार मानले.