फोटो : NSK26H33080
वडाळी : कार्यक्रमात बोलताना ॲड. बी. एस. बिरारे. शेजारी प्रताप चव्हाण, शंकर महाजन, योगेश भामरे, ॲड. निंबा माळी, ॲड. सी. एम. जगताप आदी.
-------------
ज्येष्ठ नागरिकांनी कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा
ॲड. बी. एस. बिरारे : वडाळी येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
वडाळी, ता. २१ : आयुष्यांच्या जीवन प्रवाहात अनेक चढ- उतारांचे अनुभव पाहिलेले ज्येष्ठ नागरीक हे समाजांचे आधारस्तंभ आहेत. त्यांची काळजी घेणे प्रत्यकांचे कर्तव्य आहे. त्यांच्याशी नि:स्वार्थीपणाने वागा. तरच खरी सेवा केल्यांचे समाधान मिळेल. शासन स्तरावरून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्यांचा लाभ घेऊन जीवनमान उंचवावे, असे प्रतिपादन नंदुरबार येथील विधीसेवा प्राधिकरण समितीचे विधीतज्ज्ञ ॲड. बी. एस. बिरारे यांनी केले.
वडाळी (ता. शहादा) येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समाज कल्याण विभाग, विधी सेवा प्राधिकरण समिती व श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक प्रताप चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ लिपिक शंकर महाजन, कनिष्ठ लिपिक योगेश भामरे, ॲड. निंबा माळी, ॲड. सी. एम. जगताप, जिल्हा संघटन सचिव के. डी. गिरासे, सरचिटणीस मनिलाल चौधरी, ग्राम महसूल अधिकारी जे. एन. पाटील, माजी सैनिक रामचंद्र सोनवणे, संघाचे उपाध्यक्ष रतिलाल पाटील, सचिव महेंद्र जगताप, महिला संघाच्या अध्यक्षा हिराबाई सोनवणे, सदस्या आशाबाई चव्हाण, जयवंताबाई माळी आदींसह परिसरातील विविध संघाचे अध्यक्ष सचिव, सदस्य उपस्थित होते.
समाज कल्याणचे वरिष्ठ लिपीक शंकर महाजन यांनी ज्येष्ठांसाठी शासनांच्या लाभाच्या योजनांबाबत माहिती दिली. प्रताप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. निवृत केंद्रप्रमुख मोहन बिस्नारिया यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. समाज कल्याण विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.