जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नवे नाशिकमध्ये आरोग्य शिबिर

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नवे नाशिकमध्ये आरोग्य शिबिर
Published on: 
NSK26H31217 नवे नाशिक ः ज्येष्ठ मंडळातर्फे आरोग्य शिबिरात सहभागी ज्येष्ठ नागरिक. --- नवे नाशिक ज्येष्ठ मंडळातर्फे आरोग्य शिबिर नाशिक, ता. २ : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या सहकार्याने नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे विविध उपक्रम झाले. यानिमित्त सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सानेगुरुजींच्या प्रार्थनेने झाली. या वेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर, कार्यालयीन अधीक्षक मुकेश कानडे, विशेष अधीक्षक नवनाथ डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते सावळीराम तिदमे, सुनील बागूल, प्रकाश चकोर आदींसह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निवृत्त मुख्याध्यापक सुनील ताडगे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन आनंदी व सुखकर करण्याबाबत मार्गदर्शन केले. ॲड. नीलेश पाटील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले कायदे व विविध योजनांची माहिती दिली. सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष आप्पासाहेब देसले, प्रकाश चकोर, भगवान जाधव, गिरीश गवांदे, मुकुंद पाठक, अविनाश चव्हाण, दत्ता नागरे, दत्ता नागरे, वसंत चौधरी, सुरेश सोनवणे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com