State Level Cricket Tournament : नाशिकचा एक डाव 9 धावांनी मोठा विजय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tanmay shirode and yasar sheikh

State Level Cricket Tournament : नाशिकचा एक डाव 9 धावांनी मोठा विजय!

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन सुपर लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिकने सिंधुदुर्ग संघाविरुद्ध एक डाव व ९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयाचे प्रमुख मानकरी ठरले ते शतकवीर यासर शेख, अर्धशतकवीर कर्णधार सत्यजित बच्छाव आणि सामन्यात ६ बळी घेणारा फिरकीपटु तन्मय शिरोडे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या सिंधुदुर्गला नाशिकने ४८.३ षटकांत १६० धावांत रोखले. पवन सानप व तन्मय शिरोडेने प्रत्येकी ३ तर तेजस पवार व प्रतीक तिवारीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

उत्तरादाखल सलामीवीर यासर शेखच्या जोरदार १४२ व कर्णधार रणजीपटू सत्यजित बच्छावच्या ५१ धावांच्या जोरावर ६१.३ षटकांत ९ बाद २९३ धावा करून १३३ धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावातहि तेजस पवार व तन्मय शिरोडेने प्रत्येकी ३ तर प्रतीक तिवारीने २ व यासर शेख आणि पवन सानपने प्रत्येकी १ बळी घेऊन सिंधुदुर्गला ३३.२ षटकांत १२४ धावांत गुंडाळून नाशिकला मोठा विजय मिळवून दिला.

टॅग्स :CricketNashiksports