तिनही जिल्ह्यांसाठी
स्वतंत्र प्रादेशिक विभाग
---
ज्येष्ठ नागरिकांच्या घटनात्मक मान्यता बहाल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबईच्या खानदेश प्रादेशिक विभागाचे ऐतिहासीक विक्रेंदीकरण केले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रादेशिक विभाग स्थापन करण्याच्या प्रस्तावाला नियामक मंडळाने घटनात्मक मान्यता दिली आहे. यापुढे खानदेश प्रादेशिक विभाग या एकत्रित रचनेएवजी प्रत्येक जिल्हा स्वतंत्र प्रादेशिक विभाग म्हणून कार्यरत राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खानदेश प्रादेशिक विभाग फेस्कॉम धुळे या प्रादेशिक विभागासंदर्भात २९ सप्टेंबरला नवी मुंबई येथे झालेल्या फेस्कॉमच्या नियामक मंडळाच्या बैठकीत खानदेश प्रादेशिक विभागाच्या विभाजनास मान्यता मिळाली आहे. १ एप्रिल २०२७ पासून जळगाव, धुळे व नंदुरबार असे तीन स्वतंत्र प्रादेशिक विभाग अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०२७ पर्यंत खान्देश प्रादेशिक विभाग फेस्कॉम धुळेच अस्तित्वात राहणार आहे. मात्र, त्रि-जिल्हा विभाजनाचे आदेश अद्याप निर्गमित झालेले नाहीत, असे संघांचे अध्यक्ष ॲड. अरुण धांडे व सचिव विकास बोरोले यांनी कळविले आहे.