नाशिक- मुख्यमंत्र्यांच्या सातकलमी उपक्रमांतर्गत शहर पोलिस आयुक्तालयात मंगळवार (ता. २५)पासून सुरू करण्यात आलेल्या अभ्यागत कक्षाच्या उपक्रमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. विशेषतः आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारींमध्ये अवैध सावकारीच्या गंभीर तक्रारी आल्याचे समजते. या तक्रारींची गंभीर दखल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.