धुळे : टुडे पान ४ साठी..
--
फोटो क्रमांक : 32777
साक्री : शारदोत्सव व्याख्यानमालेत मनाचा गाभारा आणि सेवेचे अंगण या विषयावर बोलताना प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर. शेजारी प्राचार्य बी. एस. पाटील, सुरेश सोनवणे, ॲड. नरेंद्र मराठे, प्रा. डी. एन. खैरनार, जगदीश वाघ, पी. झेड. कुवर, विजय भोसले आदी.
--
समृद्ध मनाच्या गाभाऱ्यासाठी सेवेची गरज
--
प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर : साक्रीत शारदोत्सव व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. १७ : मनुष्य सदैव मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करीत असतो. त्यासाठी मनाचा गाभारा समाधानाने समृद्ध असणे आवश्यक आहे. आपल्या सेवेच्या अंगणातून समाजासाठी काहीतरी देण्याचे व्रत प्रत्येकाने जीवनात अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन मालेगाव (जि. नाशिक) येथील प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर यांनी केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या शारदोत्सव व्याख्यानमालेतील मनाचा गाभारा आणि सेवेचे अंगण या विषयावर ते बोलत होते. नंदुरबार येथील जिजामाता महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य बी. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. वाचनालयाचे उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, सहकार्यवाह ॲड. नरेंद्र मराठे, प्रा. डी. एन. खैरनार, जगदीश वाघ, पी. झेड. कुवर, विजय भोसले, प्राचार्य एस. एन. खैरनार, एम. टी. ठाकरे, प्राचार्य बी. एम. भामरे, हेमंत जाधव, नितीन जगदाळे आदींसह वाचनालयाचे पदाधिकारी, श्रोते उपस्थित होते.
-
भाग्यवान श्रोते...
प्रा. डॉ. गोरवाडकर म्हणाले, की दुसऱ्यांच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधान निर्माण करण्यासाठी सेवेचे अध्यात्म रुजविणे गरजेचे आहे. निःस्वार्थ सेवा ही केवळ मदतीची कृती नसून ती जीवन जगण्याची समृद्ध दृष्टी आहे. अशा वृत्तीतून संवेदनशील माणूस घडतो. तो स्वतःचा वेळ, श्रम व सामर्थ्य समाजासाठी खर्च करतो. प्राचार्य पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्याचा उल्लेख केला. सर्वांनी अशा सेवाभावी कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रा. डॉ. प्रकाश साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नरेंद्र खैरनार यांनी आभार मानले. उपस्थित श्रोते श्री. देवरे यांना ‘भाग्यवान श्रोते’ म्हणून पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.
-