‘सेवाग्राम एक्सप्रेस’ला १९ पासून नांदगावला थांबा नाही

प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वेने नागपूर-मुंबई (सेवाग्राम) सुपरफास्ट एक्स्प्रेसचा येथील थांबा येत्या बुधवार (ता. १९)पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
nandgaon railway station
nandgaon railway statione-sakal

नांदगाव (जि. नाशिक) : येथील स्थानकावरून प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वेने नागपूर-मुंबई (सेवाग्राम) सुपरफास्ट एक्स्प्रेसचा येथील थांबा येत्या बुधवार (ता. १९)पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Sevagram Express Nandgaon stop cancelled due to poor response from passengers)

प्रवासी वर्गाकडून नाराजी

नांदगावला थांबणाऱ्या मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजरचे थांबे गेल्या वर्षभरापासून रद्द झालेले आहेत. मात्र, मुंबई व नाशिकला जाण्यासाठी स्थानिक प्रवाशांना सोयीस्कर ठरलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसचाही थांबा काढून घेण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खासदार डॉ. भारती पवार यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेवेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, याव्यतिरिक्त हबीबगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट वीकली एक्स्प्रेसही येत्या २७ व २८ मेपासून रद्द करण्यात आली आहे.

nandgaon railway station
अलर्ट! Tauktae चक्रीवादळाने बदलली दिशा; राज्यात मुसळधार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com