इगतपुरी शहर- पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत एप्रिलमध्येच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नगर परिषदेच्या हद्दीतील आदिवासी पाड्यावरील महिलांना भटकंती करावी लागते. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिलिमीटर पाऊस होत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाईच्या झळा एप्रिलपासूनच सुरू झाल्या आहेत.